कन्यारत्न पुरस्काराचे वितरण
By admin | Published: May 26, 2016 10:52 PM2016-05-26T22:52:57+5:302016-05-26T22:58:07+5:30
धोंगडेनगर मित्रमंडळाचा उपक्रम : स्त्रीभ्रूणहत्त्या विरोधी अभियान
नाशिकरोड : धोंगडेनगर मित्रमंडळातर्फे एकत्र कुटुंबव्यवस्था व स्त्रीभ्रूणहत्त्या रोखण्याच्या उद्देशाने आयोजित कन्यारत्न पुरस्काराचे वितरण उत्साहात पार पडले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्यानकार अपर्णाताई रामतीर्थंकर, महापौर अशोक मुर्तडक, नरेश कारडा, सुरेश टर्ले, नगरसेविका संगीता गायकवाड, सत्यभामा गाडेकर, फकिरराव कदम, रमेश जाधव, मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे, संजय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्याख्यानकार अपर्णाताई तीर्थंकर म्हणाल्या की, सध्या समाजामध्ये सासू-सुना, नणंद-भावजयी असे अनेक वादविवाद हे टीव्ही अथवा न्यायालयामध्ये आपणाला दिसतात.
यावेळी ज्या दाम्पत्यांना एक किंवा दोन कन्यारत्न आहेत अशा ५० जणांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अतुल धोंगडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन पाटील, श्रीमती देशपांडे व आभार राम धोंगडे यांनी मानले. यावेळी नितीन चिडे, शरद जगताप, उमेश भोई, श्याम गोहाड, योगेश गाडेकर, वैभव वाळेकर, सागर गायकवाड आदि उपस्थित होते.