आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे नगरसुलला वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 10:18 PM2021-08-04T22:18:56+5:302021-08-04T22:19:26+5:30

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संयुक्तपणे साजरी करण्यात आली. यावेळ आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचेही वाटप करण्यात आले.

Distribution of Khawati grant to the tribals | आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे नगरसुलला वाटप

आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे नगरसुलला वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देखावटी अनुदान योजनेपासून आजही अनेक लोक वंचित

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील आश्रम शाळेत अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी संयुक्तपणे साजरी करण्यात आली. यावेळ आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचेही वाटप करण्यात आले.

पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी प्रतिमापूजन करण्यात आले. गावातील दहा आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप करण्यात आले.

खावटी अनुदान योजनेपासून आजही अनेक लोक वंचित आहेत. ह्या अनुदानाने आपली दोन दिवसाची भूक भागू शकते परंतु शासनाकडून आपली असलेली मूळ मागणी आपण कसत असलेल्या गायरान जमीन, वन जमीन शासनाने तात्काळ नावे करण्यासाठी येणार्‍या काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल असेही गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रमास उपसभापती मंगेश भगत, आश्रम शाळेचे प्राचार्य विजय चव्हाण, नंदकिशोर सांगळे, संभाजी वाकचौरे, मंदा बेडके, प्रतिक देवरे, प्रीती विधाते, संदीप पैठणकर, गणेश सोनवणे, संजय कोल्हे, संतोष निकम, बल्हेगावचे सरपंच कापसे, रमेश सोनवणे, मारुती मोरे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Distribution of Khawati grant to the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.