त्र्यंबकेश्वरला खावटी किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:36+5:302021-07-17T04:12:36+5:30
मागील वर्षीच्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांची कामधंद्याअभावी उपासमार होत असल्याने त्यांना शासनाने खावटी अनुदानाची मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ...
मागील वर्षीच्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आदिवासी बांधवांची कामधंद्याअभावी उपासमार होत असल्याने त्यांना शासनाने खावटी अनुदानाची मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्या वतीने करण्यात आली होती. यात आदिवासी समाजाचे सर्व गरीब आदिवासी यांचा समावेश असावा. सततच्या पाठपुराव्यामुळे खावटी योजना मंजूर केली; पण आदिवासी समाजातील गरीब, वृद्ध विधवा, दिव्यांग अशाच लोकांना दोन हजार रुपये रोख (बँक खात्यावर जमा) व दोन हजार रुपये किमतीचा किराणा तथा जीवनावश्यक सामानाचे किट असे वाटप करण्यात आले.
------------------
त्र्यंबकेश्वर येथे खावटी किट वाटपप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, संपतराव सकाळे, डाॅ. वर्षा मीना, दीपक गिरासे, मधुकर लांडे, रूपांजली माळेकर आदी.
(१३ टीबीके खावटी)
160721\16nsk_12_16072021_13.jpg
१३ टीबीके खावटी