निर्देशापेक्षा लाभार्थ्यांना कमी धान्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 AM2021-05-30T04:12:23+5:302021-05-30T04:12:23+5:30
नांदगाव : गरीब कल्याण व अंत्योदय योजनेंतर्गत तालुक्यात दुकानदार निर्देशापेक्षा कमी धान्य वितरित करत असून, तक्रार करणाऱ्याला दमदाटी ...
नांदगाव : गरीब कल्याण व अंत्योदय योजनेंतर्गत तालुक्यात दुकानदार निर्देशापेक्षा कमी धान्य वितरित करत असून, तक्रार करणाऱ्याला दमदाटी करत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी तहसीलदार उदय कुलकर्णी यांचेकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मे व जून महिन्यांकरिता कार्डधारकांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ, तसेच राज्य शासनाच्यावतीने कार्डधारकांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ६ किलो गहू व ४ किलो तांदूळ प्रतिमाणसी मोफत देण्यात आलेले आहेत. अंत्योदय कार्डधारकांना ३५ किलो धान्य प्रतिकार्ड देण्यात यावे, असे निर्देश असताना नांदगाव तालुक्यातील काही दुकानदार कमी प्रमाणात धान्य वितरण करीत असून तक्रारदारालाच दमदाटी करत आहे.
जातेगाव येथील स्व. धा. दु. क्र.५६ मध्ये अनेक लोकांना अंत्योदयचे धान्य ३५ किलोऐवजी १० किलो देणे, माणसी ६ किलो गहू व ४ किलो तांदूळ मोफत देण्याऐवजी केवळ ३ किलो गहू व २ किलो तांदूळ देणे, खराब व कमी वजनाचे धान्य देणे, ग्राहकांशी हुज्जत घालणे असे प्रकार घडत असून सदर रेशन दुकानदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. नाही तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा ॲड. सुरेश आव्हाड यांनी दिला आहे. या वेळी जाकिर शेख, रामदास सोनवणे, फिरोज शहा, राणूबाई पवार, मुमताज शहा आदी उपस्थित होते.
---------------------
नांदगाव तहसीलबाहेर कमी धान्य मिळत असल्याचा निषेध करताना ॲड. सुरेश आव्हाड व इतर. (२९ नांदगाव १)
===Photopath===
290521\29nsk_3_29052021_13.jpg
===Caption===
२९ नांदगाव १