सिन्नरला साहित्यसेवा पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:23 AM2019-09-27T01:23:02+5:302019-09-27T01:27:37+5:30

सिन्नर : महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यसेवा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.

Distribution of Literature Awards to Sinnar | सिन्नरला साहित्यसेवा पुरस्कारांचे वितरण

सिन्नर येथे ‘मसाप’कडून राज्यस्तरीय साहित्यसेवा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी कवी विजयकुमार मिठे, प्रकाश होळकर, खलील मोमीन, विवेक उगलमुगले, मनीषा कुलकर्णी, जयश्री वाघ, कृष्णाजी भगत, पुंजाभाऊ सांगळे, नारायण वाजे, अनिल सरवार, नारायण क्षीरसागर, एम.जी. कुलकर्णी, राजाराम मुंगसे, रमेश पगार, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, वृषाली सानप, के.एल. राठी, नीतेश दातीर आदी.

Next
ठळक मुद्देराज्यस्तरीय साहित्यसेवा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : महाराष्ट्र साहित्य परिषद सिन्नरच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यसेवा वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
व्यासपीठावर कवी गीतकार प्रकाश होळकर, खलील मोमीन, विवेक उगलमुगले, मनीषा कुलकर्णी, जयश्री वाघ, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, अनिल सरवार, नारायण क्षीरसागर, उद्योजक एम. जी. कुलकर्णी, रमेश पगार, अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, वृषाली सानप, के. एल. राठी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नाव भविष्यात अभिमानाने घेतले जाईल. कारण ग्रामीण साहित्यिकांना उभारी देण्याचे उल्लेखनीय कार्य या परिषदेच्या माध्यमाने होत असल्याचे प्रतिपादन कवी विजयकुमार मिठे यांनी केले. कवी प्रकाश होळकर यांनी नामवंत साहित्यिक सिन्नरच्या भूमीत आले, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे नमूद केले. कवी रवींद्र कांगणे यांनी प्रास्ताविक, तर प्रा. जावेद शेख यांनी सूत्रसंचालन केले. नीतेश दातीर यांनी आभार मानले. असे आहेत पुरस्कारार्थी...कविता विभागात संजय चौधरी यांच्या ‘कविता माझी कबर’, मनोहर विभांडीक यांच्या ‘ह्या एका दुएसाठी’, संतोष साळसकर (माती हरवल्या कविता) कथासंग्रह प्रकारात दिनकर कुटे (कायधूळ), विजय खाडिलकर (नुक्कड), छाया बेले (वैशाख वणवा) तर कादंबरी प्रकारात बाळ भारस्कर (युगार्त), सुनील जवंजाळ (काळीज काटा), ललित प्रकारात अशोक कोतवाल (दाल गंडोरी), अशोक कोळी (अशानं असं होतं), अनंत चौधरी (उंबरगुज), बालवाङ्मय प्रकारात फारूक काझी (प्रिय अब्बू), एकनाथ आव्हाड (मिसाइल मॅन), अशोक सोनवणे (खिडकीबाहेरचे जग) तर मेंढी येथील सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गिते यांना दलित मित्र, सुमंतकाका गुजराथी यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Distribution of Literature Awards to Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक