जिल्ह्यात मका खरेदी केंद्रांचा मुहूर्त टळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:06 AM2018-11-01T02:06:54+5:302018-11-01T02:07:41+5:30
खुल्या बाजारात शेतकऱ्यांची व्यापाºयांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी यंदाही सरकारने हमीभावाने मका खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे उशिराने झालेल्या पेरणीमुळे शेतकºयांच्या मक्याचे कणीस अजूनही शेतात पडून असल्यामुळे तालुका खरेदी-विक्री केंद्रामार्फत मका खरेदीचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : खुल्या बाजारात शेतकऱ्यांची व्यापाºयांकडून होणारी लुबाडणूक टाळण्यासाठी यंदाही सरकारने हमीभावाने मका खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, यंदा पावसाच्या हुलकावणीमुळे उशिराने झालेल्या पेरणीमुळे शेतकºयांच्या मक्याचे कणीस अजूनही शेतात पडून असल्यामुळे तालुका खरेदी-विक्री केंद्रामार्फत मका खरेदीचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सन २०१८ च्या हंगामातील मक्यासाठी सरकारने १७०० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला असून, गेल्या वर्षापेक्षा २७५ रुपये दर वाढवून दिला असल्यामुळे शेतकºयांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, गेल्या वर्षी सर्वदूर समाधानकारक पडलेल्या पावसामुळे सरकारने मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून मका खरेदी केंद्रे सुरू केली होती. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्याने नाशिक जिल्ह्णात अवघ्या दोन महिन्यांत ९६,६३३ क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली. तरीदेखील जवळपास दीड हजाराहून अधिक शेतकºयांना या विक्रीपासून वंचित राहावे लागले होते. यंदा सरकारने मक्याचा हमीभाव वाढवून देत १ नोव्हेंबरपासून खरेदी-विक्री केंद्रांवर शेतकºयांनी सातबारा उताºयासह नोंदणी करून आपला मका विक्रीसाठी नेण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्णासाठी दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तालुक्याच्या तहसीलदारांनी खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी खरेदी-विक्री संघाला गुदाम उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा मक्याच्या उत्पादनात पावसाच्या वक्रदृष्टीने मोठी घट झाली असून, त्यातही उशिराने पेरणी झाल्यामुळे अजूनही काही शेतकºयांचा मका शेतात उभा आहे तर काहींनी तो काढून खळ्यावर तसाच ठेवला आहे. त्यामुळे मुहूर्तावर मक्याची खरेदी जवळपास अशक्य असल्याचे फेडरेशनच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.
संघांची तूर्त अनुत्सुकता
येवला, लासलगाव, निफाड, देवळा, सटाणा, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सिन्नर व नामपूर या दहा ठिकाणी खरेदी-विक्री संघांना पत्र देऊन मार्केट फेडरेशनने १ नोव्हेंबरपासून मक्याची नोंदणी व खरेदी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी बुधवारी मार्केट फेडरेशनने आढावा घेऊन तशा सूचना दिल्या, परंतु अद्यापही काही केंद्रांवर सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केंद्रे सुरू असल्यामुळे खरेदी-विक्री संघांनी तूर्त मका खरेदी करण्यास अनुत्सुकता दर्शविली आहे.