ब्राम्हणगाव आरोग्य केंद्रात मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:16 PM2020-03-30T15:16:09+5:302020-03-30T15:16:36+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रांताधिकारी विजय भांगरे यांच्या हस्ते मास्कचे वाटप वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी भांगरे यांनी प्रत्येक व्यक्तीने कोरोनामुळे कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती देत परिसर स्वच्छ ठेवणे व कोणीही बाहेर न फिरता सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले.

 Distribution of masks at Brahmagna Health Center | ब्राम्हणगाव आरोग्य केंद्रात मास्कचे वाटप

ब्राम्हणगाव आरोग्य केंद्रात मास्कचे वाटप

Next

ब्राम्हणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रांताधिकारी विजय भांगरे यांच्या हस्ते मास्कचे वाटप वाटप करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी भांगरे यांनी प्रत्येक व्यक्तीने कोरोनामुळे कशी काळजी घ्यावी याबद्दल माहिती देत परिसर स्वच्छ ठेवणे व कोणीही बाहेर न फिरता सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले.
सदर मास्क डॉ. विलास बच्छाव यांच्या व्यक्तिगत खर्चातून वाटप करण्यात आले. संपूर्ण गटात मास्क वाटप करणार असल्याचे डॉ. बच्छाव यांनी सांगितले. उर्वरित मास्क आशा स्वयंसेविकांमार्फत गावात घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. याप्रसंगी मविप्र उपसभापती राघो अहिरे, ज्ञानदेव अहिरे, डॉ. राहुल कांबळे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य माधव पगार, अनिल खरे ,अतुल अहिरे, तलाठी नरेश तरोटे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title:  Distribution of masks at Brahmagna Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.