सिन्नरला मास्क, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:13+5:302021-08-26T04:17:13+5:30
----------------- शिवाजीनगरला दोनशे जणांना लसीकरण सिन्नर : तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) जि.प. शाळेमध्ये ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ...
-----------------
शिवाजीनगरला दोनशे जणांना लसीकरण
सिन्नर : तालुक्यातील शिवाजीनगर (माळवाडी) जि.प. शाळेमध्ये ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस प्रत्येकी १०० जणांना नुकताच देण्यात आला. सरपंच जयश्री आव्हाड यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. माजी उपसरपंच संपत आव्हाड यांनी लसीकरणासाठी पाठपुरावा केला. गावात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन म्हस्के यांनी लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी उपसरपंच सुनंदा कांगणे, गटप्रवर्तक राजश्री आव्हाड, अमोल सानप, विठ्ठल वणवे, आरोग्यसेविका साळुंके, अर्चना भालेराव, ग्रा.पं. सदस्य म्हाळू साबळे, भीमा आव्हाड, संजय आव्हाड उपस्थित होते.
--------------
दापूर आरोग्य केंद्रास वॉशिंग मशीन भेट
सिन्नर: तालुक्यातील दापूर येथील निवृत्ती घुगे, अशोक घुगे, राधाबाई घुगे यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्रास वॉशिंग मशीन भेट देण्यात आले. रियांश घुगे, स्थाविर घुगे यांच्या वाढदिवसाच्या इतर खर्चाला फाटा देत, आरोग्य केंद्रास आवश्यक असणारी भेट देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन म्हस्के यांच्याकडे मदत सुपुर्द करण्यात आली. यावेळी मालपाठक, सुनील आव्हाड, योगेश आव्हाड, निवृत्ती बेदाडे, अशोक शिंदे, रामनाथ मतलबे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. डॉ.म्हस्के यांनी घुगे परिवाराचे आभार मानले.
----------------
कृषिदूताचे पांगरीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सिन्नर : कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कृषिदूत मनिष विलास चौधरी यानी पांगरी येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. दरवर्षी भारतामध्ये किडी आणि रोगांमुळे सरासरी २५ ते ३५ टक्के पिकांचे नुकसान होते. पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी लागवड करण्यापूर्वी बियाण्यावर जैविक आणि रासायनिक पद्धतीने बीजप्रक्रिया करणे गरजेचे ठरते, याबद्दल सविस्तर माहिती दिली.