सटाणा आगारात मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:11 PM2020-03-19T23:11:31+5:302020-03-20T00:05:30+5:30
राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या बघून सटाणा आगाराचे वाहतूक नियंत्रक हर्षल कोठावदे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे यासाठी स्वखर्चाने मास्कचे वाटप केले.
सटाणा : राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या बघून सटाणा आगाराचे वाहतूक नियंत्रक हर्षल कोठावदे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे यासाठी स्वखर्चाने मास्कचे वाटप केले.
सटाणा आगाराचे व्यवस्थापक उमेश बिरारी यांनीदेखील मास्क वाटपासाठी सहकार्य केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत आगारस्थानक प्रमुख महाजन, कामगार संघटना सचिव नितीन बोरसे, कामगार सेना सचिव राजेंद्र कापडे व सहकारी उपस्थित होते. कोरोनाबाबत एसटी कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाययोजना व कर्मचाºयांना धीर देण्याच्या उद्देशाने मास्क वाटप केल्याचे आगाराचे वाहतूक नियंत्रक कोठावदे यांनी सांगितले.