आदिवासी पाड्यांवर मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:18 PM2021-06-02T20:18:30+5:302021-06-03T00:13:22+5:30
सुरगाणा : मानव सेवा हीच ईश्वर सेवा ह्या ध्येयातून सेवा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने तालुक्यात आदिवासी पाड्यांवर भाजीपाला तसेच मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
सुरगाणा : मानव सेवा हीच ईश्वर सेवा ह्या ध्येयातून सेवा सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने तालुक्यात आदिवासी पाड्यांवर भाजीपाला तसेच मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत जाऊ नये, यासाठी अनेकजण रोजगारापासून वंचित झाल्याने दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण सुरू झाल्या. हाताला काम नसल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे अवघड झाले होते. अशा रोजगार उपलब्ध नसलेल्या आदिवासी बांधवांसाठी सेवा सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे कांदे, बटाटे, वांगी, कोबी, टमाटे, कारली, शिमला मिरची आदी भाज्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शेपुझरी, खांडोळ, भेनशेत, उंबुरणे, खोबळा, आदी गाव-पाड्यात किमान दहा दिवस पुरेल एवढे साहित्य वाटप केले. यावेळी चारशे जणांना मास्क देण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक कल्पना शिंदे, श्याम चव्हाण, मनीषा निकुंभ, प्रियंका भंडारे, अरुण सुबर, पोलीस पाटील रामदास वार्डे, माजी सरपंच दत्तू निकुळे, कन्हय्या वार्डे, वसंत म्हसे आदी उपस्थित होते.