येवल्यात पंचायत समिती तर्फे अपंगांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 09:53 PM2020-10-18T21:53:07+5:302020-10-19T00:19:54+5:30

येवला : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पंचायत समिती मार्फत तालुक्यातील अपंगांना साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Distribution of materials to the disabled by the Panchayat Samiti in Yeola | येवल्यात पंचायत समिती तर्फे अपंगांना साहित्य वाटप

येवल्यात पंचायत समिती तर्फे अपंगांना साहित्य वाटप

Next
ठळक मुद्देपंचायत समितीकडे ५४७ अपंग विद्यार्थ्यांची नोंद

येवला : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पंचायत समिती मार्फत तालुक्यातील अपंगांना साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व शिक्षण अभियान अंतर्गत अपंगांसाठी वेगळी तरतूद करून अपंगांसाठी त्यांना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी व या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सामान्य जीवन जगता यावे यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहे. पंचायत समितीकडे ५४७ अपंग विद्यार्थ्यांची नोंद आहे. यात २४७ बहु विकलांग विद्यार्थी आहेत. तर ३०० विद्यार्थी साधारण स्वरूपाचे अपंग आहेत. पहिली ते बारावी शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांसाठी पंचायत समिती शिक्षण विभागाकडून तज्ञ शिक्षक नेमण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना पंचायत समिती मार्फत सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याचे सभापती प्रविण गायकवाड यांनी यावेळी बोलतांना सागंीतले. अपंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासांी पंचायत समितीकडून शिबिर घेण्यात येईल, तसेच शासनामार्फत अपंगांना आवश्यक ते साहित्य मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल, असेही सभापती गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
माजी सभापती संभाजी पवार यांनी, यांनी पंचायत समिती शिक्षण विभाग, सभापती व सहकार्‍यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करतांना या कामात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अश्‍वासन दिले.

अपंग विद्यार्थ्यांना ट्रायसिकल रो लेटर ३, कुबडी १, व्हीलचेअर २ श्रवण यंत्र २, शैक्षणिक किट १३, मॉडीफाय चेअर एक, कॅलिपर ६ आदी साहित्यांचे उपस्थितांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तर या साहित्याचा वापर कसा करावा याबाबत प्रवीण मांडळकर, ज्ञानेश्वर कोकाटे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक तज्ञ शिक्षक हनुमंत लांडगे, योगेश लांडगे यांनी तर आभार प्रदर्शन सीमा खालकर यांनी केले. या कार्यक्रमप्रसंगी उपसभापती मंगेश भगत, महेंद्र पगारे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अन्सार शेख आदींसह अपंग विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर माळी, रवी थळकर, चारुशीला तरवाडे, राम कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Distribution of materials to the disabled by the Panchayat Samiti in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.