नांदूरवैद्य येथे साहित्य वाटप

By admin | Published: October 29, 2016 12:12 AM2016-10-29T00:12:46+5:302016-10-29T00:13:15+5:30

जिल्हा परिषद : सेस अनुदानातून मदत

Distribution of materials at Nandurwadi | नांदूरवैद्य येथे साहित्य वाटप

नांदूरवैद्य येथे साहित्य वाटप

Next

बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे दूध धंद्याला चालना देण्यासाठी पशुपालकांना स्वछ दूधनिर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषद सेस योजनेतून ५० टक्के अनुदानावर बादली, किटली, घमेले आदि साहित्य वाटप करण्यात आले. दुग्धव्यवसायात पशुपालकांना या साहित्याचा उपयोग होणार आहे. नाशिकचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत फालप, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एच. आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अस्वली स्टेशनचे सहायक पशुधन अधिकारी डॉ. एस. पी. तायडे यांनी ३८ पशुपालकांना भांडी वाटप  केले.  यावेळी पशुपालक रोहिदास सायखेडे, संजय काजळे, योगेश मुसळे, माधव कर्पे, मारु ती डोळस, पंढरीनाथ मुसळे, गोकुळ यंदे, मनोहर काजळे, प्रकाश मुसळे, भाऊसाहेब मुसळे, भाऊसाहेब दिवटे, निवृत्ती दवते, तुकाराम मुसळे, रामदास पवार, सुरेश मुसळे, ज्ञानेश्वर मुसळे, शरद दिवटे, प्रकाश बोराळे आदि पशुपालक उपस्थित होते.
 

Web Title: Distribution of materials at Nandurwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.