वनप्रस्थ फाउण्डेशनकडून साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 06:37 PM2019-10-01T18:37:22+5:302019-10-01T18:37:50+5:30

वनप्रस्थ फाउण्डेशनच्या वतीने तालुक्यातील देशवंडीच्या महादेववस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Distribution of materials from the Vanaprastha Foundation | वनप्रस्थ फाउण्डेशनकडून साहित्य वाटप

वनप्रस्थ फाउण्डेशनच्या वतीने महादेववस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना संदीप खर्डे, नयन गुजराथी, ज्ञानेश्वर माळी आदी.

googlenewsNext

सिन्नर : वनप्रस्थ फाउण्डेशनच्या वतीने तालुक्यातील देशवंडीच्या महादेववस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
सिन्नर-नायगाव मार्गावरील देशवंडी गावाच्या शिवारातील महादेववस्ती येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची वस्ती आहे. मंदिराच्या समोरच असलेल्या प्राथमिक शाळेत सुमारे ८० टक्के विद्यार्थी हे आदिवासी व गरजू कुटुंबातील आहेत. हे विद्यार्थी तीन ते चार किलोमीटर अंतरावरून पायीच शाळेत येतात. या विद्यार्थ्यांना वनप्रस्थ फाउण्डेशन गत वर्षापासून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहे. यावर्षीदेखील संस्थेचे कार्यकर्ते संदीप खर्डे व नयन गुजराथी यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना वस्तू प्रदान करण्यात आल्या. शिक्षक किशोर पगार व अरुणा पगारे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्याची यादी दिली होती. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता त्याअनुषंगाने साहित्य देण्यात आले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक उत्तम कापडी, दत्तात्रय डोमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका छोटेखानी कार्यक्र मात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी संतोष जाधव, ज्ञानेश्वर माळी, दत्तात्रय बोºहाडे, श्याम गवळी, अभिजित देशमुख आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Distribution of materials from the Vanaprastha Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.