अभोणा येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 09:03 PM2020-04-22T21:03:24+5:302020-04-23T00:19:54+5:30
अभोणा : लॉकडाउनमुळे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थी प्रतिव्यक्ती एका महिन्यात पाच किलो तांदूळ मोफत देण्यास अभोणा येथे प्रथमच सुरु वात करण्यात आली.
अभोणा : लॉकडाउनमुळे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थी प्रतिव्यक्ती एका महिन्यात पाच किलो तांदूळ मोफत देण्यास अभोणा येथे प्रथमच सुरु वात करण्यात आली. यावेळी माजी सरपंच राजेंद्र पाटील यांच्या हस्ते वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नंदकुमार मराठे, सुधाकर सानवणे, किसन काळे, गणपत दुसाने, शफी शेख, राजेंद्र हिरे उपस्थित होते. लाभार्थींनी संस्थेचे सचिव पुंडलिक बिरार व समाधान पाटील यांनी चुनाखडीने आखून दिलेल्या जागेवर उभे राहून तोंडाला मास्क लावून तांदूळ घेतला.