सोशिलडस्टन पाळत पोषण आहराच्या धान्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:45 PM2020-04-04T16:45:19+5:302020-04-04T16:53:38+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या धान्यांचे सोशलडिस्टन पाळत वितरण करण्यात आले.

Distribution of nutritious dietary grains in the care of the Socialildston | सोशिलडस्टन पाळत पोषण आहराच्या धान्यांचे वाटप

सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सोशलडिस्टन पाळत धान्य वितरीत करतांना मुख्याध्यापक महेश महाले, आर. बी. वाघचौरे व पालक आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांऐवजी पालकांना बोलून त्या सर्वांना एक मिटरच्या अंतरावर उभे करून धान्यांचे वितरण

नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या धान्यांचे सोशलडिस्टन पाळत वितरण करण्यात आले.
येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारातील तांदूळ व अन्य कडधान्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच नलिनी गिते, शालेय समितीचे अध्यक्ष दत्ता दिघोळे, उपाध्यक्ष उत्तम आव्हाड, मुख्याध्यापक महेश महाले, आर. बी. वाघचौरे आदी उपस्थित होते.
यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी धान्य घेण्यासाठी विद्यार्थ्यांऐवजी पालकांना बोलून त्या सर्वांना एक मिटरच्या अंतरावर उभे करून धान्यांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान गावातील शिधा पत्रिका धारकांनाही सोशलडिस्टन पाळत गेल्या तीन दिवसांपासून धान्य वितरीत करण्यात आले. धान्यवाटप करणाऱ्या गोदा युनियन कृषक संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना ठराविक अंतरात उभे करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली.
 

Web Title: Distribution of nutritious dietary grains in the care of the Socialildston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.