बालकांना पोषण आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 08:56 PM2020-05-07T20:56:06+5:302020-05-07T23:50:00+5:30
नांदूरवैद्य : देशभरात जीवघेण्या कोरोनाने धुमाकूळ घातल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शासनाकडून राज्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच अंगणवाडीला सुट्टी जाहीर केली आहे.
नांदूरवैद्य : देशभरात जीवघेण्या कोरोनाने धुमाकूळ घातल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे शासनाकडून राज्यातील शाळा, महाविद्यालये, तसेच अंगणवाडीला सुट्टी जाहीर केली आहे. याच पाशर््वभूमीवर महिला व बालविकास विभागाच्या वतीने सहा मिहने ते तीन वर्षापर्यंतची बालके, गर्भवती, स्तनदा माता तसेच अतिकुपोषित बालके तसेच तीन वर्ष ते सहा वर्षापर्यंतची अंगणवाडीमधील बालकांना इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील अंगणवाडीत अंगणवाडी सेविका सुमन मुसळे, सुनिता मुसळे, मोनिका सोनवणे यांच्या हस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या बालकांमध्ये प्रामुख्याने कुपोषित बालकांचा अधिक सामावेश असल्याने अंगणवाड्या बंद केल्याने त्यांच्या कुपोषण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.यामुळेच नांदूरवैद्य येथे अंगणवाडी सेविकांनी बालकांना हरभरा, डाळ, हळद, मिरची, तेल, मीठ, तांदूळ आणि गहू आदीं वस्तूंचा सामावेश असलेल्या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.