आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटप केल्याने पंचवटीत तणाव; पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको

By अझहर शेख | Published: June 22, 2024 12:16 PM2024-06-22T12:16:01+5:302024-06-22T12:16:15+5:30

दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रके वाटणाऱ्या संशयिताला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. सदर वाटप केलेले पत्रके काही नागरिकांच्या हातात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

Distribution of leaflets with offensive content caused tension among the Panchayats; Stop the road in front of the police station | आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटप केल्याने पंचवटीत तणाव; पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको

आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटप केल्याने पंचवटीत तणाव; पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको

संदीप झिरवाळ, पंचवटी : येथील राजवाडा परिसरात हिंदू युवा वहिनीच्या लेटर हेडवर एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट करून पत्रके परिसरात वाटल्याने समाज संतप्त झाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाला असून शनिवारी सकाळी (दि.22) राजवाड्यातील शंभर ते दीडशे नागरिकांनी मोर्चा काढून घोषणाबाजी करत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.

 दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रके वाटणाऱ्या संशयिताला अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली. सदर वाटप केलेले पत्रके काही नागरिकांच्या हातात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट केलेले पत्रक कोणीतरी संशयितांनी वाटल्याच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदू युवा वाहिनीच्या शहराध्यक्षाचे सदर पत्रकात नाव असल्याने पंचवटी पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना ताब्यात घेतल्याचे समजते. पंचवटी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Web Title: Distribution of leaflets with offensive content caused tension among the Panchayats; Stop the road in front of the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.