मानोरीत ‘एक मूठ पोषण’ आहाराचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 07:14 PM2020-10-04T19:14:43+5:302020-10-04T19:15:34+5:30
मानोरी : राज्य शासन आणि महिला बालविकास एकात्मिक प्रकल्पांतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एक मूठ पोषण आहार अभियानांतर्गत पोषण आहाराचे वाटप सरपंच नंदाराम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
मानोरी : राज्य शासन आणि महिला बालविकास एकात्मिक प्रकल्पांतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एक मूठ पोषण आहार अभियानांतर्गत पोषण आहाराचे वाटप सरपंच नंदाराम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. कुपोषित बालकांच्या पोषणावर लक्ष केंद्रित करून बालकांचे वजन वाढविण्यासाठी एक मूठ पोषण आहार हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम अंगणवाड्यांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अंडी, केळी, बटाटे, गूळ, शेंगदाणे, मूग आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अंगणवाडी सेविका संगीता कविश्वर, देवराम शेळके, किरण शेळके, परशराम साठे, बाबासाहेब वाघ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.