नांदूरवैद्य येथील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत कीटकनाशकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:25 PM2019-12-29T22:25:25+5:302019-12-29T22:25:59+5:30
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे तालुका कृषी विभागाकडून रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला असून, हरभरा उत्पादनवाढीसाठी हरभरा पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांच्या उपस्थितीत हरभरा पीक प्रात्य-क्षिकांसाठी निवड करण्यात आलेल्या महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात येऊन कीटकनाशकांचे वाटप करण्यात आले.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे तालुका कृषी विभागाकडून रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला असून, हरभरा उत्पादनवाढीसाठी हरभरा पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांच्या उपस्थितीत हरभरा पीक प्रात्य-क्षिकांसाठी निवड करण्यात आलेल्या महिला शेतकऱ्यांची शेतीशाळा घेण्यात येऊन कीटकनाशकांचे वाटप करण्यात आले.
इगतपुरी तालुका कृषी विभागामार्फत नवीन वाणाचा प्रचार-प्रसार, उत्पादन वाढ व कडधान्य पीक क्षेत्रात वाढ होण्यासाठी नांदूरवैद्य येथे २५ एकरसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला असून, आरव्हीजी २०२ या वाणाचे हरभरा पीक प्रात्यक्षिके तसेच दर आठवड्याला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदूरवैद्य येथील शेतकºयांची या हरभरा पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली असून, सदर शेतकºयांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक प्रात्यक्षिके दाखविण्यात येत आहेत. या सत्रातील शेतीशाळेच्या हरभरा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याचे कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांनी सांगितले.
याचा फायदा तालुक्यातील सर्व महिला व शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित महिला व शेतकºयांना कृषी सहायक एस.डी. चव्हाण यांनी केले. नांदूरवैद्य येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपसरपंच मोहन करंजकर व कृषी सहायक एस. डी चव्हाण यांच्या हस्ते येथील शेतकºयांना कीटकनाशके व फिनल ट्रॅपचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच मोहन करंजकर, पंढरीनाथ मुसळे, कृषी सहायक एस. डी. चव्हाण, ग्रा.पं. सदस्य नितीन काजळे, सुकदेव दिवटे, रमेश दवते, दत्तू काजळे, बाळू यंदे, लक्ष्मण मुसळे, दशरथ, सुभाष मुसळे, राजू यंदे, बाजीराव काजळे आदी शेतकरी उपस्थित होते.
कृषी सहायक चव्हाण यांनी शेतकºयांना हरभरा पिकावर येणारे रोग, कीड व त्यावरील उपाययोजनांच्या माहितीचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे हरभरा पिकासाठी जमिनीची निवड, पेरणी पद्धत, द्यावयाची खतमात्रा, तणनियंत्रण, कीड व रोगनियंत्रणाबाबतचे मार्गदर्शन सहभागी महिला शेतकºयांना करण्यात आले.