पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात पीपीई किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 03:00 PM2020-05-05T15:00:19+5:302020-05-05T15:00:25+5:30
पेठ - कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी सेवा देणाऱ्या पेठ येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.
पेठ - कोरोना विषाणूच्या निर्मूलनासाठी सेवा देणाऱ्या पेठ येथील ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रांतिक सदस्य भारत टाकेकर यांचे मार्फत आधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट देण्यात आले.सद्या ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला असून संभाव्य खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशासन सतर्क झाले आहे.
याप्रसंगी जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश कहांडोळे, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित,सभापती विलास अलबाड नगराध्यक्ष मनोज घोंगे उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, पेठ तालुका काँग्रेस चे अध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष याकुब शेख, उपाध्यक्ष विलास जाधव, सरचिटणीस चिंतामण खांबईत, वैद्यकीय अधिकारी डॉ शेखर पाटील आदी उपस्थित होते.
-----------------------
कोरोनाचा वाढता प्रादुभाव आणि त्यामूळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण यातून सावरण्यासाठी व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी भागातील प्रशासकिय व आरोग्य यंत्रणेला समाजाने सहकार्य करु न योग्य नियमांचे पालन करणे ही आवश्यक आहे.
-भारत टाकेकर, प्रांतिक सदस्य, कॉग्रेस
-------------------