प्रथम मतदान करणाऱ्या २०० मतदारांना अमृतकार पतसंस्थेकडून बक्षिसांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 08:58 PM2019-10-23T20:58:30+5:302019-10-23T21:01:30+5:30

देवळा : येथील अमृतकार पतसंस्थेने प्रथम मतदान करणाºया २०० मतदारांना बक्षिसांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कोठावदे यांनी दिली.

Distribution of prizes from Amritkar Patsanstha to five voters who voted first | प्रथम मतदान करणाऱ्या २०० मतदारांना अमृतकार पतसंस्थेकडून बक्षिसांचे वाटप

अमृतकार पतसंस्थेतर्फे मतदारांना बक्षिसवाटप करतांना भारत कोठावदे, समवेत राजेंद्र आहीरराव आदी.

Next
ठळक मुद्देमतदारांना बक्षिस वाटप करण्याचा निर्णय

देवळा : येथील अमृतकार पतसंस्थेने प्रथम मतदान करणाºया २०० मतदारांना बक्षिसांचे वाटप करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत कोठावदे यांनी दिली.
रघुनाथ हरी अमृतकार पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते मतदारांचा गौरव करण्यात आला.
लोकशाहीचे सदृढीकरण व मतदानाची टक्केवारी वाढावी ह्या उद्देशाने मतदारांना बक्षिस वाटप करण्याचा निर्णय पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासाठी चीनी बनावटीच्या पणत्या न घेता एका महीला बचत गटाकडून पणत्या खरेदी करण्यात आल्या. मतदान केल्यानंतर दुसºया दिवशी मंगळवारी (दि.२२) सकाळी पतसंस्थेच्या कार्यालयात मतदान केल्याची माहिती मतदाराने दिल्यानंतर लोहोणेर व देवळा येथे पतसंस्थेच्या दोन्ही कार्यालयात प्रत्येकी १०० मतदारांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष भारत कोठावदे, संचालक राजेंद्र आहीरराव, राजेंद्र वडनेरे, संजय आहिरराव, प्रा. आर. के. पवार, सतिश कोठावदे, नंदकुमार खरोटे, शरद मेतकर आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of prizes from Amritkar Patsanstha to five voters who voted first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.