कायझेन स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:35 PM2019-07-19T23:35:54+5:302019-07-20T00:08:20+5:30
सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आणि व्यवसायवृद्धी साधण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये उत्पादन वाढ व गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे. कायझेनच्या माध्यमातून सकारात्मक बदल शक्य आहे, असे प्रतिपादन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले.
सातपूर : सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी आणि व्यवसायवृद्धी साधण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये उत्पादन वाढ व गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे महत्त्वाचे आहे. कायझेनच्या माध्यमातून सकारात्मक बदल शक्य आहे, असे प्रतिपादन निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी केले.
निमात आयोजित निमा जीआयझेड काईझेन स्पर्धेतील पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनीचे माजी उपाध्यक्ष हिरामण आहेर, परीक्षक विनोद मानवी, श्याम कोठावदे, अमोल कामत उपस्थित होते. कायझेन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. श्रीकांत बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी केले. निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शशिकांत जाधव, सचिव सुधाकर देशमुख, मंगेश पाटणकर, संदीप भदाणे, संजय सोनवणे, हर्षद ब्राह्मणकर, संजय महाजन, संजय देशमुख, जितेंद्र शिर्के, नीलिमा पाटील, उदय खरोटे आदींसह उद्योजक व व्यावसायिक उपस्थित होते.
१० कोटी ते ५० कोटींच्या दरम्यान उलाढाल असलेल्या गटातून प्रथम विजेते म्हणून अभिजित टेक्नो प्लास्टचे अमोल वाघमारे, रवींद्र पगार, मीना महिरे, सविता शेवाळे, मीना चौधरी तर द्वितीय विजेते म्हणून प्रीती इंजिनिरिंग वर्क्सचे चिन्नपिलाई सरवनन, सचिन पंडित, ओमप्रकाश यादव, सुखदेव गदादे यांना गौरविण्यात आले. तृतीय विजेते म्हणून लामा नीरजचे अतुल मुंदडा, जगदीश चांदवानी, भगवान महाजन यांना गौरविण्यात आले.
५० कोटी ते ३०० कोटी दरम्यान उलाढाल असलेल्या उद्योग गटातून प्रथम विजेते म्हणून गोल्डी प्रिसिजनचे के. पी. भामरे, एस. टी. बोरसे, मिरेकर, सी. बी. डिक्कर तर द्वितीय विजेते म्हणून श्वेता प्रिंट पॅकचे सुनील देशमुख, राहुल नाईक, रोहन परदेशी, दीपक नाईकवाडे, गोरक्षनाथ जाधव तसेच १० कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या उद्योग गटातून प्रथम विजेते म्हणून नितेश आॅटो इंजिनिअरिंगचे राकेश दयाल व राजेंद्र महाजन द्वितीय विजेते म्हणून एनएसके फॅबचे कमलेश उशीर, सचिन धात्रक, तुषार जाधव यांना गौरविण्यात आले.