मतदारन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:47 AM2021-02-05T05:47:38+5:302021-02-05T05:47:38+5:30
संपूर्ण भारतभर २५ जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जाता. जनता इंग्लिश स्कूलमध्ये मतदार जनजागृती, मतदार दिन ...
संपूर्ण भारतभर २५ जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा केला जाता. जनता इंग्लिश स्कूलमध्ये मतदार जनजागृती, मतदार दिन निबंध व रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार पंकज पवार, प्राचार्य बी.जी. पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, उपमुख्याध्यापक यू.डी. भरसठ, पर्यवेक्षक बी.बी. पूरकर, के.एस. वारुंगसे, यू.डी. बस्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य बी.जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जनता इंग्लिश स्कूलमध्ये मतदार दिन विषयावर निबंध व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे, निबंध स्पर्धा- माध्यमिक गट प्रथम- त्रिवेण फड, द्वितीय- प्रगती अपसुंदे, तृतीय- संध्या गावीत, कनिष्ठ महाविद्यालय गट प्रथम- कुमारी प्रतीक्षा पवार, द्वितीय- उन्नती बोलकर, तृतीय क्रमांक- प्रतीक चौधरी, रांगोळी स्पर्धा- माध्यमिक गट प्रथम- तन्वी पगारे, द्वितीय- गायत्री देशमुख, गायत्री, तृतीय- अपेक्षा मोरे, महाविद्यालयीन गट- प्रथम - कुमारी दुहिता चौधरी, द्वितीय- ऋतुजा अपसुंदे, तृतीय - रोहिणी झनकर.
इन्फो
मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा सन्मान
मतदार दिनाच्या निमित्ताने दिंडोरी तालुक्यातील ग्रामसेवक सर्वेश पाटील, तलाठी के. पी. देशमुख, पर्यवेक्षक आर.एम. पवार, संगणक परिचालक राजू पाटील, जगदीश बागुल, अंगणवाडी व सेविका सुरेखा बोरस्ते, कोतवाल रतन खैरनार, कर्मचारी विनोद जाधव आदींना उत्कृष्ट बीएलओ म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
फोटो- २५ दिंडोरी व्होटर
जनता इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित मतदार दिन कार्यक्रमप्रसंगी विजेत्या स्पर्धकांसमवेत प्रांताधिकारी डॉ.संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, प्राचार्य बी.जी. पाटील, आबासाहेब तांबे, यू. डी. भरसठ, बी.बी. पूरकर आदी.
===Photopath===
250121\25nsk_11_25012021_13.jpg
===Caption===
फोटो- २५ दिंडोरी व्होटर जनता इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित मतदार दिन कार्यक्रमप्रसंगी विजेत्या स्पर्धकांसमवेत प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, प्राचार्य बी. जी. पाटील, आबासाहेब तांबे , यू. डी. भरसठ ,बी. बी. पूरकर आदी.