ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कडधान्याचे होणार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:55 PM2020-03-28T22:55:35+5:302020-03-29T00:25:42+5:30
पेठ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय आणि १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउनची केंद्र शासनाची घोषणा या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी शिल्लक तांदूळ व कडधान्य समप्रमाणात विद्यार्थांना वाटप करण्यात यावे, अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त अनुदानातून देशातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू असून, सध्या कोरोनामुळे शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. मात्र या कालावधीत शालेय विद्यार्थी पोषण आहार योजनेपासून वंचित आहेत अशा प्रकारच्या याचिका दाखल करण्यात आल्या. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने परिपत्रकाद्वारे शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व कडधान्य विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत पालकांना वाटप करण्यात येणार असून, सर्वच
पालकांना एकाच वेळी शाळेत न बोलावता टप्प्याटप्प्याने पालक व विद्यार्थी यांना बोलवण्यात यावे तसेच दिव्यांग किंवा आजारी पालक किंवा विद्यार्थांच्या घरी जाऊन तांदूळ व कडधान्य वाटप करावे, असेही सांगण्यात आले आहे.सोशल डिस्टन्सिंगची घ्या खबरदारी
शालेय मुलांना धान्यवाटप करताना कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान एक मीटरचे अंतर राहील, असे नियोजन करावे लागणार असून, यामध्ये कोणीही एकमेकांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रारंभी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शाळानिहाय शिल्लक धान्यादी मालाचा आढावा घेण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांना तांदूळ व कडधान्य वाटप करण्यात येणार आहे.