फळविहीरवाडी शाळेतील मुलांना रेडिओचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:36 AM2020-12-04T04:36:22+5:302020-12-04T04:36:22+5:30

कार्यक्रमाची सुरुवात सभापती कचरे यांच्या हस्ते सरस्वतीदेवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ...

Distribution of radios to the children of Phalvihirwadi school | फळविहीरवाडी शाळेतील मुलांना रेडिओचे वाटप

फळविहीरवाडी शाळेतील मुलांना रेडिओचे वाटप

Next

कार्यक्रमाची सुरुवात सभापती कचरे यांच्या हस्ते सरस्वतीदेवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, गटशिक्षणाधिकारी माधुरी कांबळे उपस्थित होते. यानंतर आदिवासी संस्कृतीचे जतन म्हणून कांबडा हे आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी फळविहीरवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते तानाजी करंजकर व योगेश करंजकर यांच्या वतीने रेडिओचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख कैलास भवारी यांनी तर सूत्रसंचालन लोहरे यांनी केले. यावेळी राम शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी तायडे, खेड केंद्राचे केंद्रप्रमुख कापडणीस, सरपंच संतु साबळे, मुख्याध्यापक कोंडाजी भांगरे, ग्रामपंचायत सदस्य धोंडू कातोरे, शंकर साबळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शांताराम कातोरे, पंकज महाराज दुरगुडे, योगेश कोरडे, लक्ष्मण निरगुडे, हिरामण कातोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

===Photopath===

021220\02nsk_5_02122020_13.jpg

===Caption===

फळविहीरवाडी येथील गरजू मुलांना रेडिओचे वाटप करतांना पंचायत समिती सभापती जया कचरे. समवेत जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, गटशिक्षणाधिकारी माधुरी कांबळे, राम शिंदे व ग्रामस्थ.०२ नांदूरवैद्य १

Web Title: Distribution of radios to the children of Phalvihirwadi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.