टाके घोटीत दिव्यांगांना शिधापत्रिका वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:44+5:302021-08-20T04:18:44+5:30
खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांनी याकामी दाखवलेल्या दानशूर भूमिकेची शासन स्तरावर निश्चित नोंद करण्यात येईल, असे प्रतिपादन तहसीलदार ...
खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांनी याकामी दाखवलेल्या दानशूर भूमिकेची शासन स्तरावर निश्चित नोंद करण्यात येईल, असे प्रतिपादन तहसीलदार परमेश्वर कासुळे दिव्यांगांना डी.एन. लहाने कॉलेजमध्ये शिधापत्रिका वाटपप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर लहाने, स्वदेशी ग्रुपचे बाळासाहेब देशमाने, साहिल मेहता, विनीत चोरडिया, विशाल मेहता उपस्थित होते.
दिव्यांगांना शिधापत्रिका वाटप करण्यासाठी अगोदर दस्तावेज आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जमा करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी येणारे सर्व शासकीय शुल्क लहाने यांनी दिले होते. नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे, पुरवठा विभागाच्या मोहिनी पगारे, आपले सरकार सेवा केंद्र इगतपुरी यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी १०० दुय्यम, ३५ प्राधान्य व दहा विभक्त प्राधान्य शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. जे लाभार्थी उपस्थित राहू शकले नाहीत अशा लाभार्थ्यांनी आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोपाळ शिंदे यांनी केले.
यावेळी आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेचे विश्वस्त व आपले सरकार केंद्राचे सुनील तोकडे, कृष्णा लंगडे, यांसह प्रहार संघटनेचे अशोक ताथेड, नितीन गव्हाणे, विलास काणकट, सोपान परदेशी, ज्ञानेश्वर गोवर्धने, शिवाजी काळे आदी उपस्थित होते.
फोटो - १९इगतपुरी शिधापत्रिका
इगतपुरी येथील टाके घोटी येथे दिव्यांगांना शिधापत्रिका वाटपप्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे, ज्ञानेश्वर लहाने, बाळासाहेब देशमाने व लाभार्थी.
190821\19nsk_29_19082021_13.jpg
इगतपुरी येथील टाके-घोटी येथे दिव्यांगांना शिधापत्रिका वाटपप्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे, ज्ञानेश्वर लहाने, बाळासाहेब देशमाने व लाभार्थी.