बलिप्रतिपदादिनी विद्रोहीरत्न पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:53 AM2019-10-31T00:53:18+5:302019-10-31T00:53:36+5:30
बलिप्रतिपदा सणाचे औचित्य साधून शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी एकत्र येत समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रबोधन करणाºया मान्यवरांना विद्रोहीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.
नाशिक : बलिप्रतिपदा सणाचे औचित्य साधून शहरातील विविध पुरोगामी संघटनांनी एकत्र येत समाजासाठी झटणाऱ्या आणि प्रबोधन करणाºया मान्यवरांना विद्रोहीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.
हुतात्मा स्मारक येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परिवर्तनवादी, आंबेडकरवादी, रिपब्लिकन, डावे समाजवादी, अत्याचार विरोधी कृती समिती, अ. भा. किसान सभा, संभाजी ब्रिगेड, घंटागाडी कामकार संघटना, नवनाथपंथीय बहुद्देशीय संस्था, नशाबंदी मंच, कॉँग्रेस एस.सी. सेल, एस.के. फाउंडेशन, आम्ही सारे नागवंशीय या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
बलिप्रतिपदा दिनाचे औचित्य साधून शहरातून बळीराजा गौरव रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक समितीचे मुख्य निमंत्रक राहुल तुपलोंढे यांनी केले. यावेळी अ.भा. किसान सभेचे सुनील मालुसरे, प्रफुल्ल वाघ, भारतीय बौद्ध महासभेचे बच्छाव गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. आंबेडकर पुतळा येथून या गौरव रॅलीला सुरुवात झाली. दिलीप लिंगायत, लहुजी वस्ताद यांची वेशभूषा केलेले रोहित कानडे आणि शेतकºयाची वेशभूषा केलेले योगेश बर्वे यांनी लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमासाठी नितीन पाटील, अविनाश अहेर, गणपत कटारे, सविता खैरनार, स्मिता तुपलोंढे, योगेश बर्वे, रोहित कानडे, दिलीप लिंगायत, योगेश कापसे, संतोष नाथ, सचिन जाधव, बापू पवार, अनिता पाटील, वैशाली जाधव आदींनी प्रयत्न केले.
यांचा झाला गौरव
उमा दिंडे सोनवणे (मानवाधिकार), अनिल आठवले (सामाजिक), नाना बच्छाव (शेतकरी संघटना), प्रमोद साखरे (युवक चळवळ), चंद्रकांत बोंबले (मनपा कर्ममारी), डॉ. स्वप्नील इंगळे (संभाजी ब्रिगेड) यांना गौरविण्यात आले. नवनाथपंथीय संस्थेला उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार देण्यात आला.