आरोग्य केंद्र कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 08:09 PM2020-04-18T20:09:17+5:302020-04-19T00:45:42+5:30
पेठ : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून, यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी म्हणून सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.
पेठ : ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाययोजना केल्या जात असून, यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेतली जावी म्हणून सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. करंजाळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉॅ. सिद्धांत वैद्य यांच्या हस्ते कर्मचाºयांना मास्क, सॅनिटायझर व फेस सील्डचे वाटप करण्यात आले. तालुका शीघ्र कृती पथकच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र करंजाळी कार्यक्षेत्रात आशा, एएनएम,आरोग्य सेवक, आरोग्य सहायक यांच्याद्वारे घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक सर्वेक्षण चालू आहे. सर्दी, खोकला, ताप, श्वास घ्यायला त्रास रु ग्णाचे सर्वेक्षण तसेच बाहेरगावाहून तसेच हॉट स्पॉट क्षेत्रातून आलेले होम क्वॉरण्टाइन नागरिकांना दिवसातून दोन वेळा भेट व पाळत ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोरोना योद्ध्यांना संसर्ग टाळणे व विषाणूपासून बचावासाठी फेस सिल्ड, मास्क वाटप करण्यात आले. जेणेकरून डोळे, नाक व तोंड झाकले जाऊन डबल प्रोटेक्शन मिळेल व आरोग्य कर्मचारी स्वस्थ राहून जोमाने काम करतील. प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धांत वैद्य, बाळासाहेब चौधरी, प्रफुल्ल राठोड, वैशाली गवळी, ज्ञानेश्वर गवळी, उपसरपंच बामणे, औषधनिर्माण अधिकारी शेखर चित्ते, कर्मचारी प्रदीप ढाकणे आदी उपस्थित होते.
--------
पेठ तालुक्यातील जनतेला आवाहन करण्यात येते की, कोरोना आजाराचा संसर्ग महाराष्ट्र व देशात झालेला आहे, त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. घरीच राहा, सुरक्षित राहा. मास्कचा वापर अवश्य करा. वारंवार हात धुवा. सध्या पेठ तालुक्यात एकही कोरोनाचा रु ग्ण नाही त्यामुळे आपण याबाबतीत सतर्कराहून कोरोनासारख्या महामारीला तालुक्यात शिरकाव करू न देता संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्र कोरोनामुक्त करूया.
- डॉ. मोतीलाल पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी, पेठ