कळवण येथे स्वच्छता महोत्सव पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:39 PM2019-09-10T23:39:02+5:302019-09-10T23:42:07+5:30
कळवण : गावाचा खरा विकास करायचा असल्यास गावात शास्वत स्वच्छता टिकविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वच्छाग्रहींची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी केले.

कळवण पंचायत समिती व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्वच्छ सर्वेक्षण २०१९, स्वच्छता महोत्सव पुरस्कार वितरण व स्वच्छाग्रही कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सभापती जगन साबळे, उपसभापती पल्लवी देवरे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम उपस्थित होते. राजेश मोरे यांनी स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन केले. यावेळी स्वच्छ महोत्सव व स्वच्छता दर्पण या उपक्र मात उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वछाग्रहींना, जलसुरक्षकांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी जाधव, डॉ. सुधीर पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी सहाणे, शाखा अभियंता जे. के. गोवर्धने, विस्तार अधिकारी एस. डी. महाले, एस. एन. आढाव, डी. एस. वाघ, उत्तम भोये, विजय ठाकरे, मीरा पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महारू निकम व सचिन मुठे यांनी केले. आभार डी. ए. पवार यांनी मानले.