शिवाजीनगर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सँनिटायझर, मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:09 IST2020-04-06T18:07:02+5:302020-04-06T18:09:11+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

शिवाजीनगर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सँनिटायझर, मास्कचे वाटप
नायगाव : सिन्नर तालुक्यातील शिवाजीनगर (कहांडळवाडी) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
येथिल ग्रामपंचायतीचे सरपंच आण्णासाहेब कहांडळ यांच्या हस्ते सँनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी लाँकडाऊनमुळे शहरात जाता येत नसल्यामुळे येथिल ग्रामस्थांची अडचण ओळखून ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने या साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामसेवक व पदाधिका-यांनी घरोघर जाऊन वाटप केले.
यावेळी उपसरपच पुंजाहरी कहांडळ,शामराव कहांडळ,ग्रामसेवक जी.आर.वटाणे,दशरथ सूर्यवंशी,राहुल कहांडळ,आशा कार्यकर्ती योगिता कहांडळ,विठ्ठल उगले,अशोक घेगडमल,सुनिल पवार,गौतम घेगडमल आदी उपस्थितीत होते.
फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातील शीवाजीनगर ( कहांडळवाडी ) येथिल ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे वाटप करतांना सरपंच अण्णासाहेब कहांडळ,उपसरपंच पुंजाहरी कहांडळ,जी.आर.वटाणे,योगिता कहांडळ,विठ्ठल उगले,अशोक घेगडमल,सुनिल पवार,गौतम घेगडमल आदी.