सारोळे खुर्द सरंपचाकडून सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:06 PM2020-05-04T21:06:29+5:302020-05-04T23:03:18+5:30
काकासाहेब नगर : निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील ग्रामपंचायत सरंपच दत्तात्रय पाटील डुकरे यांनी स्वखर्चातून गावातील ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप केले.
काकासाहेब नगर : निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथील ग्रामपंचायत सरंपच दत्तात्रय पाटील डुकरे यांनी स्वखर्चातून गावातील ग्रामस्थांना सॅनिटायझरचे वाटप केले.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग पाहिजे त्या प्रमाणावर काळजी घेत नसल्याचे डुकरे पाटील यांच्या सदर बाब लक्षात आली. शेतात कामे करताना दहा वीस मिनिटांच्या अतंराने हात साबनाने धुण्याची सुचना आरोग्य विभागातील डॉक्टर तसेच त्या विभागातील कमॅचारी देत असताना ही नागरिक याकडे डोळझाक करत असल्याचे डुकरे यांनी ही बाब हेरली. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे महत्व लक्षात आणून देत व वापरण्याच्या सूचना दिल्या.
---------
मीच माझा रक्षक या टॅगलाईन नुसार मी गावचा प्रथम नागरिक या नात्याने मी म्हणजे माझे गाव व गावच्या सवॅ जनतेच्या आरोग्याची काळजी करणे माझे काम आहे़ शेतात राबणारा मजुर वा शेतकरी सारखा हात धुवत नसल्याने सॅनिटायझर वापरून आपली काळजी घेईल व करोना पासून बचाव होईल़
-दताञय पाटील डुकरे,
सरंपच, सारोळे खुर्द
--------------
कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागातील मजुर, जनता, शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतातील मालाला भाव नाही. लॉकडाऊनमुळे सर्व बंद आहे. गावातील नागरिकांना स्वखर्चाने सरपंच दताञय पाटील डुकरे यांनी सॅनिटायझरचे वाटप केले.
- गोटीराम जाधव, नागरिक ,
सारोळे खुर्द