खामखेडा येथील जवानाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 06:52 PM2019-03-11T18:52:58+5:302019-03-11T18:54:50+5:30
खामखेडा : येथील रोशन बोरसे या जवानाने आपल्या वाढदिवस साजरा नकरता त्याच दिवशी गावातील शाळमधील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
खामखेडा : येथील रोशन बोरसे या जवानाने आपल्या वाढदिवस साजरा नकरता त्याच दिवशी गावातील शाळमधील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील विद्यालयात सन २०११-१२ या वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेत गेट टुगेदर कार्यक्र माचे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्र माच्या सुरवातील शाळेच्या विद्यार्थिनी स्वागत गीत म्हणून केले. या कार्यक्र माच्या सुरवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. या या कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक टी. टी. देवरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन केले. शालेय आठवणींबरोबरच काही गमतीदार किस्से कथन केले. यावेळी लष्कराच्या सेवेत असलेले रोशन बोरसे हे जवान सुटीवर आला असल्याने त्यांनी आपल्या शाळेतील मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सर्व वर्ग मित्रांना मोबाइलवरून संपर्कसाधून मेळशव्याचे आयोजन केले. यामेळाव्या दरम्यान लष्करातील जवान रोशन बोरसे यांचा वाढदिवस आल्याने यांनी आपला वाढदिवसाला पार्टीचा खर्च न करतांना शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास, दप्तर आदी शालेय उपयोग साहित्याचे वाटप केले.
यावेळी काकाजी शेवाळे, रोशन बोरसे, प्रशांत शेवाळे, वैभव बोरसे, देविदास बच्छाव, मोहन शेवाळे, मनोज मोरे, मोहिनी हिरे, राणी बोरसे, सुवर्ण पांडे आदी उपस्थित होते.
जवान रोशन जिभाऊ बोरसे हे खामखेडा गावातील सदर शाळेचे विद्यार्थी असून ते सध्या लष्कराचे प्रशिक्षण पूर्ण होऊन जम्मू येथे देश रक्षणाच्या सेवेत आहेत. ते या वेळेदरम्यान गावी सुटीवर आल्याने या कार्यक्र मात त्यांनी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले.