ठाणगावी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:39+5:302021-06-30T04:10:39+5:30
दापूर येथे १७०० नागरिकांचे लसीकरण सिन्नर : तालुक्यातील दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ...
दापूर येथे १७०० नागरिकांचे लसीकरण
सिन्नर : तालुक्यातील दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, व्यावसायिक, फ्रंटलाइन वर्कर यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. लसीकरण शांततेत पार पडले. डॉ. नितीन म्हस्के, डॉ. राहुल हेंबाडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश आव्हाड, सरपंच रमेश आव्हाड, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, राजू आव्हाड, समाधान आव्हाड, म्हाळू गामणे, नंदू आव्हाड, अरुण आव्हाड आदी उपस्थित होते.
वीज पडून दोन शेळ्या ठार
सिन्नर : तालुक्यातील धनगरवाडी (पिंपळगाव) येथील शेतकरी रावसाहेब बाबूराव डुंबरे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या शेळ्यांवर वीज पडून दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. शहा, पंचाळे, धनगरवाडी, सोमठाणे परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजता विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. शेळ्या सुमारे बारा ते पंधरा हजार रुपये किमतीच्या असल्याने डुंबरे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
बारा बलुतेदार महासंघाचे निवेदन
सिन्नर : बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण बाधित ठेवण्यात यावे, मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे, ओबीसींची जनगणना करण्यात यावी आदींसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. जी.एल. पवार, लक्ष्मण बर्गे, सुनील दातरंगे, बाबूराव सुरवाडकर, महेंद्र कानडी, विजय खर्डे, अशोक सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शहीद राकेश आणेराव यांना सोनारीत अभिवादन
सिन्नर : तालुक्यातील सोनारी येथे शहीद जवान राकेश आणेराव यांना १६व्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, कारगील योद्धा मेजर दीपचंद यांनी शहीद जवान राकेश आणेराव यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरपंच रामनाथ शिंदे, उपसरपंच नामदेव वारुंगसे, व्ही राजे ग्रुपचे अध्यक्ष विठ्ठल उगले, मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, श्रीराम पतसंस्था चेअरमन भाऊसाहेब शिंदे, दशरथ काळुंगे, संदीप ढोकणे, राजेंद्र आहेर, रामनाथ डावरे, माजी सैनिक संघटनेचे विजय कतोरे, विश्वास लोखंडे, आणेराव कुटुंबाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.