सप्तशृंगी देवी ट्रस्टतर्फे शालेय साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:50+5:302021-07-26T04:13:50+5:30
श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, सेवाभावी, भाविक सेवा-सुविधा यासह विविध उपक्रम ...
श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेच्या वतीने विविध सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, सेवाभावी, भाविक सेवा-सुविधा यासह विविध उपक्रम सातत्यपूर्वक आयोजित केले जातात. ट्रस्टच्या वतीने आदिवासी व ज्या गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करून नव्याने शैक्षणिक प्रवाहात सामील होता येणार आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम सुरु ठेवण्याचा विश्वस्त संस्थेचा मानस आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने ५५० विद्यार्थी - विद्यार्थिनींना ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीवर्धन देसाई यांच्या हस्ते शालेय साहित्याचे व ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत पाटील, भूषणराज तळेकर यांच्या उपस्थितीत केले. व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
फोटो - २५ कळवण १
श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करताना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीवर्धन देसाई, विश्वस्त ॲड. ललित निकम, दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत पाटील, भूषणराज तळेकर, सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे आदी.