गरजू महिलांना  शिलाई मशीन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:01 PM2018-01-28T23:01:53+5:302018-01-29T00:10:24+5:30

आदिवासी भागातील गरजू महिलांना आपल्या पायावर उभे करून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने डोमखडक येथील सुमित्रा बहुद्देशीय सहकारी संस्थेच्या सहकार्याने महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Distribution of sewing machines to needy women | गरजू महिलांना  शिलाई मशीन वाटप

गरजू महिलांना  शिलाई मशीन वाटप

googlenewsNext

पेठ : आदिवासी भागातील गरजू महिलांना आपल्या पायावर उभे करून व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने डोमखडक येथील सुमित्रा बहुद्देशीय सहकारी संस्थेच्या सहकार्याने महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.  याप्रसंगी तहसीलदार हरीष भामरे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सुमित्रा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष सुमित्रा राऊत, सहायक गटविकास अधिकारी ए.बी. भुसावरे, माजी सभापती मनोहर चौधरी, तालुकाध्यक्ष दामू राऊत, माजी उपसभापती महेश टोपले, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरीश गावित, शहराध्यक्ष करण करवंदे, नगरसेवक गणेश गावित, तुळसाबाई फोदार, दुर्गाबाई पालवी, पूनम गवळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गिरीश गावित यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. येथील तेली समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्र मात आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते शिलाई मशीन वाटप करण्यात आले. आदिवासी महिला या प्रशिक्षणाने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील व आपल्या कुटुंबाचा खर्च भागविण्यास सक्षम होतील, असे यावेळी झिरवाळ यांनी सांगितले. तहसीलदार हरीष भामरे यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून आपली उन्नती करून घेताना मुलांचे पालनपोषण व शिक्षणाची जबाबदारीही सक्षमपणे पार पाडावी, असे आवाहन केले. यावेळी पेठ शहर व तालुक्यातील ३५ महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of sewing machines to needy women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक