जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून शहीद गोसावी कुटुंबियांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 05:43 PM2018-11-16T17:43:45+5:302018-11-16T17:44:03+5:30
सिन्नर : जम्मू-काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर ) येथील जवान नायक केशव गोसावी यांच्या कुटुंबियांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शहीद केशव यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सिन्नर : जम्मू-काश्मीर मध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर ) येथील जवान नायक केशव गोसावी यांच्या कुटुंबियांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शहीद केशव यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
गोसावी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने व शहीद केशव यांचे वडील सोमिगरी हे अपंग असल्याने त्यांच्या नावे जिल्हा परिषदेच्या सेसमधून घरकुलासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल असे सांगून समाजकल्याण विभागाकडे यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा असे आदेश अध्यक्ष सांगळे यांनी गटविकास अधिकाºयांना दिले. शहीद केशव यांच्या निवासस्थानी सांगळे, गावित यांनी वीरपिता सोमिगरी गोसावी, वीरपत्नी यशोदा यांची भेट घेतली. यशोदा यांनी नाजूक परिस्थितीत समोर आलेल्या अकल्पित संकटाचा धीरोदात्तपणे सामना केला. यापुढील काळात तब्बेतीची काळजी घेऊन शहीद केशव यांचे कुटुंबाप्रती असणारे जबाबदारीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगून संपूर्ण तालुका व जिल्हा या दु:खात गोसावी कुटुंबासोबत असल्याची ग्वाही सांगळे यांनी दिली.
गोसावी कुटुंब राहत असलेल्या घराची अवस्था पाहून ६५ टक्के अपंग असणाºया सोमिगरी गोसावी यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या ३ टक्के अपंग कल्याण निधीतून नवीन घरकुल बांधण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केली. पंचायत समितीचे याबाबतचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेकडे सादर करावा असे आदेश त्यांनी समवेत असलेल्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना दिले. ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय गिरी, शिंदेवाडीचे ग्रामसेवक प्रमोद शिरोळे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गोकुळ नरोडे, गटप्रमुख दशरथ हंडोरे, दिलीप हांडोरे, पप्पू शेख, बाबासाहेब कोकाटे, एकनाथ हंडोरे, वाल्मीक हांडोरे, गणेश बिरे, योगेश हांडोरे, धनंजय अंधारे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.