सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया शिवपार्वती प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:21 AM2018-02-04T01:21:00+5:302018-02-04T01:22:37+5:30
नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़
नाशिक : सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व ज्योतिषशास्त्रात विशेष योगदान देणाºया पाच मान्यवरांचा शनिवारी (दि़३) पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला़ गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलमधील कूर्तकोटी सभागृहात स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या हस्ते पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती आध्यात्मिक पुरस्कार डॉ़ बाबासाहेब तराणेकर (इंदूर), पुण्यश्लोकश्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार नाशिक येथील अनिल महाराज जोशी, नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार नाशिक येथील विनायकशास्त्री दाणी, शंकर हरी औरंगाबादकर शैक्षणिक पुरस्कार पुणे येथील पंडित जकातदार यांना, तर सर डॉ़ आप्पासाहेब गोसावी लोकसेवा पुरस्कार नागपूर येथील डॉ़ एस़ टी़ देशमुख यांना प्रदान करण्यात आला़ प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ़ मो़ स़ गोसावी यांनी सांगितले की, कर्मकांडातून भारतीय संस्कृतीला बाहेर काढायचे असेल विज्ञानाची कास धरावी लागेल व त्यासाठी शिक्षण हे एकमेव हत्यार आहे़ मात्र सद्यस्थितीत परीक्षार्थी जास्त असल्याने यामध्ये विकासाची व संस्थात्मक कामाची तसेच समुपदेशनाची गरज असल्याचे सांगून गोसावी यांनी ४० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला़ पुरस्कारप्राप्त अनिल जोशी यांनी शिवपार्वती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून मनोगतामध्ये, लहान मुलांवर सुसंस्कार करण्याची गरज असल्याचे सांगितले़ तर पुरस्कारार्थी जकातदार यांनी, सध्याची मोबाइलची पिढी ही पालकांना अत्यवस्थ करीत असून, या पिढीला समुपदेशनाची आवश्यकता असल्याचे सांगितले़ त्यासाठी ज्योतिषशास्त्राऐवजी तर्कशास्त्राचा उपयोग करणे हिताचे असून अॅस्टॉकौन्सिलर ही संज्ञा या पिढीमध्ये समाजात रुजणे गरजेचे असल्याचे सांगितले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवज्योती या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले़ यावेळी सेवाव्रती अनुबंधी दम्पती, आदर्श संस्था पुरस्कार, वैदेही सर्जनशीलता पुरस्कार, गुणवंत व प्रज्ञावंत यांचा गौरव करण्यात आला़ सूत्रसंचालन मुग्धा जोशी यांनी केले़ डॉ़ के. आऱ शिंपी यांनी आभार मानले़ यावेळी सुनंदाताई गोसावी, कल्पेश गोसावी, डॉ़ दीप्ती देशपांडे, प्राचार्य, कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व अध्यक्ष स्वामिनी स्थितप्रज्ञानंद यांनी आपल्या भाषणात मानवाने आपले कर्म हे फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने केले पाहिजे़ निरपेक्ष भावनेने केलेल्या सामाजिक कार्यामुळे मानवाचे जीवन आनंदमय होत असल्याचे स्वामिनी म्हणाल्या़ यावेळी त्यांनी शिवपार्वती प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले़