दातली, चिंचोलीला स्मार्ट ग्राम पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:31+5:302021-08-19T04:18:31+5:30
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिनी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पंचायत समितीच्या सभापती रोहिणी कांगणे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी पुरस्कार स्वीकारला.
दरम्यान, २०१९-२० चा ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’ ग्रुप ग्रामपंचायत दातली व २०२०-२१ चा ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’ चिंचोली ग्रामपंचायत यांना देण्यात आला. दातलीचे सरपंच हेमंत भाबड, ग्रामविकास अधिकारी परेश जाधव, तसेच चिंचोलीचे सरपंच नवनाथ बर्डे व ग्रामविकास अधिकारी रामदास इंगळे यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी सुनीता सानप, चिंचोलीचे उपसरपंच भाऊराव झाडे, माजी सरपंच संजय सानप, दत्तू नवाळे, नितीन आव्हाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजू नवाळे, सदस्य संदीप झाडे, प्रभाकर उगले, सोमनाथ लांडगे, महेंद्र गोळे, अशोक गिते, प्रभाकर लांडगे, कर्मचारी सुरेश तुपे, संजय थोरात आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - १८ दातली स्मार्ट
महाआवास अभियानांंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या दातली व चिंचोली ग्रामपंचायतीला मिळालेला स्मार्ट ग्राम पुरस्कार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वीकारताना गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे.
180821\18nsk_35_18082021_13.jpg
फोटो - १८ दातली स्मार्ट