राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 05:17 PM2020-03-09T17:17:19+5:302020-03-09T17:18:21+5:30
मालेगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धुळे येथील वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन समिती व नवी दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या २९ व्यक्ती व ५ संस्थांचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्र माचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा विजय देसाई होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर निलेश आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तृष्णा गोपनारायण, अक्र म खान, रत्ना शिंदे, अॅड. बी. के. शिंदे, प्रा. अशोक शिंदे, ओम देशमुख, संजय फतनानी, भास्कर शिंदे, सुनिल गरु ड, अजय बिरारी, रंजन खरोटे आदि उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन समितीचे राज्याध्यक्ष तानाजी शिंदे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे अॅड. बी. के. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारार्थीमध्ये परिवर्तन महिला मंडळ, आम्ही मालेगाव कर संघटना, विश्वास देवरे, दीपक शेटे आदींचा समावेश होता. कार्यक्र मास सिध्दांत निकम, मंगेश निकम, रतिलाल निकुंभ, रवींद्र अहिरे, जितेंद्र वाघ, चंद्रशेखर देवरे, भरत देवरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचलन अमोल निकम तर आभार अनिल पाटील यांनी मानले.