दोडीत सेवानिवृत्त जवानांकडून वाफ घेण्याच्या उपकरणांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:14 AM2021-05-06T04:14:36+5:302021-05-06T04:14:36+5:30

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मदत व जनजागृती म्हणून हा उपक्रम राबविल्याची माहिती सचिन केदार व धनंजय केदार ...

Distribution of steam equipment by retired soldiers | दोडीत सेवानिवृत्त जवानांकडून वाफ घेण्याच्या उपकरणांचे वाटप

दोडीत सेवानिवृत्त जवानांकडून वाफ घेण्याच्या उपकरणांचे वाटप

Next

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मदत व जनजागृती म्हणून हा उपक्रम राबविल्याची माहिती सचिन केदार व धनंजय केदार यांनी दिली. दोडी बुद्रुक येथे महिनाभरापासून २० पेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच गावातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांनी प्रतिबंधक उपाययोजना करून कोरोनापासून स्वतःचे संरक्षण करावे, यासाठी प्रत्येक कुटुंबाला वाफ घेण्याचे उपकरण भेट तसेच त्यानिमित्ताने त्यांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्या उद्देशाने गावातील पोलीस, सैन्यातील जवान व निवृत्त जवान यांनी निर्णय घेतला. यासाठी सोशल मीडियावर एक समूह तयार करून सर्वांना आवाहन केले. यातून आतापर्यंत एक लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम जमली असून, त्यातून पहिल्या टप्प्यात वाफ घेण्याची उपकरणे खरेदी केली आहेत. ही उपकरणे गावातील नागरिकांना मोफत दिली जात असून, त्यासोबत कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याच्याही सूचना दिल्या जात आहेत. कोरोनाकाळात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे हाच मार्ग असल्यामुळे ही भेट दिल्याचे सचिन केदार यांनी सांगितले. येथील विलगीकरण कक्षाला सॅनिटायझर व वाफेचे मशीन शाळेचे कार्यालय प्रमुख पी. डी. विंचू यांच्याकडे सोपविण्यात आले. या उपक्रमाचे जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच ज्योती भालेराव आदींसह ग्रामस्थांनी कौतुक केले. उपक्रमास सचिन केदार चंद्रकांत केदार, नवनाथ शेळके, खंडू आव्हाड, शिवाजी भालेराव, संदीप डोंगरे, रामभाऊ उगले, धनंजय केदार, अनिल केदार आदींसह पोलीस, जवान आदींचे सहकार्य लाभले.

फोटो ओळी : ०५ दोडी १

दोडी येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी वाफ घेण्याचे उपकरण देताना निवृत्त सैनिक सचिन केदार.

===Photopath===

050521\05nsk_11_05052021_13.jpg

===Caption===

दोडी येथे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी वाफ घेण्याचे उपकरण देताना निवृत्त सैनिक सचिन केदार.

Web Title: Distribution of steam equipment by retired soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.