जिल्हा बॅँकेसाठी चिन्हांचे वाटप गॅस सिलिंडर गोठवले

By Admin | Published: May 13, 2015 12:51 AM2015-05-13T00:51:52+5:302015-05-13T00:52:53+5:30

जिल्हा बॅँकेसाठी चिन्हांचे वाटप गॅस सिलिंडर गोठवले

Distribution of symbols for district bank frozen gas cylinders | जिल्हा बॅँकेसाठी चिन्हांचे वाटप गॅस सिलिंडर गोठवले

जिल्हा बॅँकेसाठी चिन्हांचे वाटप गॅस सिलिंडर गोठवले

googlenewsNext

  नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या ४५ उमेदवारांना मंगळवारी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले, मैदानात उतरलेल्या तिन्ही पॅनलने सहयोगी उमेदवारांसाठी त्याच चिन्हांचा आग्रह धरल्याने पिंगळे-कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलला पतंग, हिरे-बच्छाव यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलला कपबशी व ढिकले-कदम पॅनलला छत्री निशाणी देण्यात आली. दरम्यान, सिन्नर गटातील सागर जाधव यांच्या निवडणूक चिन्हावरून काही काळ वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना छत्री निशाणी देण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश खरे व सहायक अधिकारी गोपाळ मावळे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना चिन्ह वाटप करते वेळी तिन्ही पॅनलच्या प्रमुखांनी गॅस सिलिंडरची मागणी केली. प्रत्येकाने आपला हट्ट कायम ठेवतानाच अनेक दाखलेही दिले, परंतु अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी गॅस सिलिंडर चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर वाद संपुष्टात येताच तिन्ही पॅनलला देण्यात आलेल्या चिन्हावर सहमती मिळविण्यात आली. यावेळी पॅनलच्या प्रमुखांनी सोसायटी व राखीव गटातील उमेदवारांची यादी सादर करून चिन्हाची मागणी केली. त्यासोबत उमेदवाराचे पत्रही जोडण्यात आल्यामुळे फारसा वाद झाला नाही, मात्र सिन्नर सोसायटी गटाचे उमेदवार सागर जाधव हे निवडणूक चिन्ह वाटप करतेवेळी उपस्थित नसल्याने भाऊसाहेब हिरे व उत्तमराव ढिकले या दोन्ही पॅनलने जाधव यांच्यावर दावा सांगितला. त्यावर आमदार अनिल कदम यांनी सागर जाधव हे ढिकले पॅनलचे असल्याचे सांगून त्यांना छत्री निशाणी देण्यात यावी, अशी मागणी केली व थेट जाधव यांनाच दूरध्वनी करून निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलणी करून दिली. परंतु जोपर्यंत उमेदवार प्रत्यक्षात पुढ्यात येऊन सांगत नाही तोपर्यंत चिन्ह न देण्याचे ठरविण्यात येऊन साडेचार वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. अखेर जाधव हजर झाल्यावर त्यांना छत्री निशाणी देण्यात आली. या निवडणुकीत नशीब अजमावित असलेले अपक्ष सुभाष अहिरे यांना बॅट, उद्धव अहेर यांना रोडरोलर, तर पंडित देशमाने यांना कुऱ्हाड निशाणी देण्यात आली. (जोड आहे)

Web Title: Distribution of symbols for district bank frozen gas cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.