भारत विकास परिषदेतर्फे ताडपत्रींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:56+5:302021-07-29T04:14:56+5:30
इगतपुरी तालुक्यातील घोटी भंडारदरा रस्त्यावर उभाडे गावातील आदिवासी वस्तीमधील ५० घरकुलांना घराच्या छतावर टाकायला ताडपत्री देण्याचा प्रकल्प राबवण्यात आला. ...
इगतपुरी तालुक्यातील घोटी भंडारदरा रस्त्यावर उभाडे गावातील आदिवासी वस्तीमधील ५० घरकुलांना घराच्या छतावर टाकायला ताडपत्री देण्याचा प्रकल्प राबवण्यात आला. दोन्ही संस्थांतील ३० कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वस्तीवर जाऊन ताडपत्रींचे वाटप केले.
यासाठी भारत विकास परिषद नाशिक शहर शाखाचे अध्यक्ष द्वारका तिवारी, सचिव राजीव परांजपे, गुंज फौंडेशन, नाशिकचे अध्यक्ष राजेश बोरा व सचिव सौ. विनिता बांका यांनी प्रयत्न केले.
प्रकल्प प्रमुख या दोन्ही संस्थानाचे सदस्य असलेले डॉ. मुकेश अग्रवाल तसेच भारत विकास परिषदेचे सभासद सुनील मुसळे, राजेंद्र जडे, नारायण दुधारे, हेमंत जोशी व उमेश ठक्कर आणि गुंज फौंडेशनचे २० पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो- २८ भारत विकास
उभाडे गावातील आदिवासी बांधवांना ताडपत्रींचे वाटप करताना भारत विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
280721\28nsk_18_28072021_13.jpg
फोटो- २८ भारत विकास उभाडे गावातील आदिवासी बांधवांना ताडपत्रींचे वाटप करताना भारत विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.