ग्रामीण भागात पाठ्यपुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 08:32 PM2020-06-15T20:32:28+5:302020-06-15T23:58:15+5:30
पेठ : कोरोना संसर्गामुळे या वर्षीचा शाळेचा पहिला दिवस शाळेऐवजी मुलांचा शेतात घरच्या माणसांना मदत करण्यात गेला. पेठ तालुक्यात पहिल्या दिवशी एकही शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरा-वरून केंद्रनिहाय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
पेठ : कोरोना संसर्गामुळे या वर्षीचा शाळेचा पहिला दिवस शाळेऐवजी मुलांचा शेतात घरच्या माणसांना मदत करण्यात गेला. पेठ तालुक्यात पहिल्या दिवशी एकही शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरा-वरून केंद्रनिहाय मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कोरोनासंदर्भात पेठ तालुका ग्रीन झोनमध्ये असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाचा धोरणात्मक निर्णय येईपर्यंत शाळा सुरू न करण्याचा कल पालकांसह प्रशासनाचा असल्याने तूर्तास मुलांना शाळेत बोलवू नये, असे सांगण्यात आले.
मात्र शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा व मोजक्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहच करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
बहुतांश शाळांमध्ये पाहिल्या दिवशी शाळेत हजेरी लाऊन स्वत:च शाळांची स्वच्छता करून घेतली. ग्रामीण भागात पालकांसह विद्यार्थी शिक्षकांकडे शाळा सुरू करण्याबाबत विचारणा करताना दिसून येत होते. सध्या पेरणी व शेतकामाचे दिवस असल्याने तालुक्यात बहुतांश विद्यार्थी पहिल्या दिवशी शिवारातच दिसून आले.
-------------------------------------
प्राथमिक शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणी
कळवण : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आज सर्वत्र स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. कळवण नगरपंचायतने शहरातील प्राथमिक शाळा सॅनिटायझर करून शाळा परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या. कळवण खुर्द येथील प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांनी स्वखर्चाने स्वत:च्या ट्रॅक्टर व ब्लोअरच्या मदतीने सॅनिटायझर केली. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याचा शासन निर्णय असल्यामुळे मुख्याध्यापकांना पाठ्यपुस्तके वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुक्यात मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वाटप करीत शाळा परिसर व पाण्याची टाकी स्वच्छता केली. विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षणासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले असून, विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या गूगल लिंकने भरून प्रवेश देणे सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांनी दिली.