शहरातील विविध शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:02 AM2018-06-17T00:02:32+5:302018-06-17T00:02:32+5:30
शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.
नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले.
शिशुविहार बालक मंदिर
सीएचएमई सोसायटी संचलित बालक मंदिर शाळेत पहिल्या दिवशी ढोल-ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी भूषण गोसावी व संघाचे उपाध्यक्ष क्षत्रिय उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, पुस्तक भेट देण्यात आले. विभागप्रमुख नीता पाटील यांनी मार्गदर्शन केले.
उन्नती माध्यमिक विद्यालय
पंचवटी येथील उन्नती माध्यमिक विद्यालयात प्रथम दिनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे, बापूराव शिनकर, राजेंद्र बागड, नीळकंठ खैरनार, उत्तमराव उगले उपस्थित होते. मुख्याध्यापक शिरुडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन डी. टी. राणे यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
देवधर इंग्लिश स्कूल
पुणे विद्यार्थीगृह संचलित डॉ. काकासाहेब देवधर शाळेत ढोल-ताशांच्या गजरात तसेच फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून नवागतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी स्वागत गीत म्हटले. कार्यक्रमास संचालक संजय गुंजाळ, मुख्याध्यापक मनीषा साठे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उंटवाडी माध्यमिक विद्यालय
नाएसोच्या उंटवाडी माध्यमिक विद्यालयात नवगतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकारिणी सदस्य भा. द. गायधनी, नवीन तांबट यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी, पर्यवेक्षक अशोक कोठावदे, मधुकर पगारे, दिलीप पवार, शालेय समिती अध्यक्ष पां. म. अकोलकर आदी उपस्थित होते.
श्रीरामकृष्ण परमहंस विद्या निकेतन
श्रीरामकृष्ण परमहंस विद्या निकेतन, दत्तनगर या विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक भारती शिरसाठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक कमलेश बोडके, सामाजिक कार्यकर्ते कुणाल बोडके उपस्थित होते. यावेळी शेवाळे, स्मिता शिरसाठ, नागरे, कोकणी आदी उपस्थित होते.
बिटको हायस्कूल
डी. डी. बिटको शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, सचिव हेमंत बरकले, रोहित वैशंपायन आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक रेखा काळे, जयश्री पेंढारकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमास उपप्राचार्य कांचन जोशी, सुभाष महाजन, टाकळकर, साहेबराव वाघ, किसन बागुल उपस्थित होते.
नालंदा अकॅडमी
नालंदा अकॅडमी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतानिमित्त पताका लावून वर्गांची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
ग्लोबल व्हिजन स्कूलतर्फे स्वच्छता मोहीम
शाळेच्या पहिल्या दिवशी ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलतर्फे सिडकोतील काही स्मारकांच्या स्वच्छता उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व आणि राष्ट्रपुरु षांचे कार्य आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या अंगी यावे याकरिता शहरातील काही प्रमुख स्मारकांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन नाशिक येथील महाराणा प्रताप चौक येथील महाराणा प्रताप पुतळा, अहिल्याबाई होळकर, पाथर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सिडको येथील स्टेट बँक आॅफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, यांची साफसफाई करण्यात केली. शाळेचा पहिला दिवस पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन एक नवा पायंडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घालून दिला आहे.