रासायनिक खते विक्रेत्यांना थम स्कॅन मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 07:12 PM2020-11-04T19:12:30+5:302020-11-04T19:13:52+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यात रासायनिक खतांच्या साठेबाजीला आला घालण्यासाठी आता थम मशीन विक्रेत्यांना सक्तीचे करण्यात आले असून, त्याचे वाटप बुधवारी (दि.४) करण्यात आले.

Distribution of Tham Scan Machine to Chemical Fertilizer Vendors | रासायनिक खते विक्रेत्यांना थम स्कॅन मशीनचे वाटप

सटाणा येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील रासायनिक खतविक्रेत्यांना मोफत थम स्कॅन मशीनचे मोफत वाटप करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत एस.एस. पवार, हेमंतकुमार काथेपुरी, प्रणय हिरे.

googlenewsNext
ठळक मुद्देसटाणा : साठेबाजीला आळा बसविण्यासाठी कृषी विभागाची योजना

सटाणा : बागलाण तालुक्यात रासायनिक खतांच्या साठेबाजीला आला घालण्यासाठी आता थम मशीन विक्रेत्यांना सक्तीचे करण्यात आले असून, त्याचे वाटप बुधवारी (दि.४) करण्यात आले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात थम स्कॅन मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंतकुमार कथेपुरी, कृषी अधिकारी प्रणय हिरे, अरुण भामरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील खतविक्रेत्यांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना यंदा रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला नाही. अधिकाऱ्यांचा आणि विक्रेत्यांचा समन्वय असल्यामुळे पुरवठा सुरळीत असल्याचे आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी यापुढे खते घेताना भविष्यात तांत्रिक अडचणी येऊ नये म्हणून थम स्कॅनचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. तालुका कृषी अधिकारी पवार यांनी थम स्कॅन मशीनबद्दल सविस्तर माहिती दिली.
चौकट...

साठेबाजीला बसणार आळा
कृषी विभाग आणि आरसीएफच्या वतीने थम स्कॅन मशीन मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीनमुळे प्रत्येक विक्रेत्याकडे किती रासायनिक खतांचा साठा शिल्लक आहे. त्याचे प्रत्येक मिनिटाला अपडेट मिळणार आहे. त्यामुळे साठेबाजी आणि खतांचा काळाबाजार याला आळा बसणार आहे. तालुक्यात सटाणा, नामपूर, जायखेडा, ताहाराबाद, वीरगाव, डांगसौंदाणे, लखमापूर, मुल्हेर हे खत विक्रेत्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून, तब्बल १२९ परवानाधारक आहेत. असे असले तरी ६३ विक्रेतेच सद्या खतांची विक्री करत आहेत. आज सर्वच्या सर्व विक्रेत्यांना थम स्कॅन मशीनचे वाटप करण्यात आले.
 

Web Title: Distribution of Tham Scan Machine to Chemical Fertilizer Vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.