कादवा गौरवच्या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 12:33 AM2021-11-01T00:33:15+5:302021-11-01T00:33:59+5:30

जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून प्रत्येकाने लिहिले पाहिजे. तरच ते साहित्य उच्च पातळीवर पोहोचते, असे प्रतिपादन साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी कादवा प्रतिष्ठानच्या वतीने दोन वर्षांचे कादवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले.

Distribution of two year award of Kadava Gaurav! | कादवा गौरवच्या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण !

कादवा गौरव पुऱस्कारार्थींसमवेत श्रीराम शेटे, प्रा. यशवंत पाटील, बाबासाहेब सौदागर, डॉ. शिवाजी शिंदे, विजयकुमार मिठे, विठ्ठल संधान.

Next

नाशिक : जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून प्रत्येकाने लिहिले पाहिजे. तरच ते साहित्य उच्च पातळीवर पोहोचते, असे प्रतिपादन साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी कादवा प्रतिष्ठानच्या वतीने दोन वर्षांचे कादवा गौरव पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले.

प.सा. नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर कादवा साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, प्रा. यशवंत पाटील, कवी आणि गीतकार बाबासाहेब सौदागर, डॉ. शिवाजी शिंदे, विजयकुमार मिठे, विठ्ठल संधान आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौदागर यांनी नाशिकच्या प्रस्तावित साहित्य संमेलनात जिल्ह्यातील योग्य आणि गुणी कवींची पुरेशी दखल घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी उपक्रमाचे कौतुक करून सर्व पुरस्कारार्थींच्या प्रतिभेबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

 

इन्फो

या सोहळ्याप्रसंगी कादवा गौरव मायबाप पुरस्कार डॉ. शिवाजी शिंदे, बाळासाहेब लभडे, सुनील जाधव, संदीप जगदाळे, डॉ. राजेश गायकवाड, अनघा तांबोळी, जे. पी. खैरनार, प्रशांत भरवीरकर, साईनाथ पाचारणे, डॉ. विशाल इंगोले, भीमराव वाकचौरे, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, विठ्ठल जाधव, निशा डांगे, डॉ. विद्याधर बनसोड, संजय मोहल्ले, डॉ. फुला बागुल, लतिका चौधरी, आशा पाटील, डॉ. पृथ्वीराज तौर, यांना तर अन्य पुरस्कार देऊन सुरेश कळमकर, नितीन गांगुर्डे, डॉ. दीपक बागमार, जी.आर. आढाव, नितीन झगर, विलास जमधडे, हंसराज देशमुख, भगवान गायकवाड, ज्ञानेश्वर गणोरे आदी मान्यवरांना गौरविण्यात आले.

 

Web Title: Distribution of two year award of Kadava Gaurav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.