महाराजस्व अभियानात विविध दाखल्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 07:01 PM2019-12-15T19:01:27+5:302019-12-15T19:01:53+5:30
वडनेर भैरव महाराजस्व अभियान २०१९-२० अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर व विस्तारीत समाधान योजना यांचे आयोजन वडनेरभैरव महसुल मंडळ येथे तहसील कार्यालय चांदवड यांचे माध्यमातुन करण्यात आले.
वडनेरभैरव : वडनेर भैरव महाराजस्व अभियान २०१९-२० अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर व विस्तारीत समाधान योजना यांचे आयोजन वडनेरभैरव महसुल मंडळ येथे तहसील कार्यालय चांदवड यांचे माध्यमातुन करण्यात आले.
या कार्यक्रमात ८५०विद्यार्थ्यासाठी तयार करण्यात आलेले वय व अधिवास, जातीचे प्रमाणपत्र, दाखले प्रातिनिधीक स्वरु पात वितरीत करण्यात आले. विस्तारीत समाधान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व लाभ वाटप याकरिता तालुक्यातील २१ प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.हा कार्यक्र म चांदवड उपविभागाचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे व तालुक्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमास नायब तहसीलदार डॉ. मिनाक्षी गोसावी, तहसिल कार्यालयातील हळदे भाऊसाहेब, इरफान कुरेशी, देशपांडे, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गावातील पदाधिकारी , सरपंच शांताबाई बेंडके, उपसरपंच रावसाहेब भालेराव, बाळासाहेब माळी , वडनेरभैरव मंडळाचे मंडळ अधिकारी विजय भंडारे, तसेच वडनेरभैरव मंडळातील सर्व तलाठी, तलाठी गजानन गुंडरे, उदय महेर, श्रीमती. सारीका पाटील, धोडंबे तलाठी, धोंडगव्हाण तलाठी, शिक्षक, महाराष्ट्र बॅक अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.