खैरेवाडी गावात विविध साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:09 PM2019-05-29T18:09:28+5:302019-05-29T18:10:18+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांतून जनजागृती करणारे दिवंगत शाहीर शिवनाथ लक्ष्मण मराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावात विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
घोटी : इगतपुरी तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांतून जनजागृती करणारे दिवंगत शाहीर शिवनाथ लक्ष्मण मराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावात विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कळसुबाई मित्रमंडळातर्फे या उपक्र माचे आयोजन बुधवारी (दि.२९) आयोजन केले होते. इगतपुरी तालुक्यातिल अतिदुर्गम भागातील घाटनदेवीच्या घाटमाथ्याखाली नाशिक, ठाणे, पालघर ह्या तीन जिल्हाच्या सीमेवरील २०० लोकवस्तीच्या खैरेवाडी येथे आधुनिक जगाची कोणतीही सुविधा नाही. अद्यापही गावाला पक्का रस्ता, विजेची सुविधा उपलब्ध नाही. १ किलोमीटर अंतरावरून महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागते. गावातील कोणी आजारी झाले तर डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. अत्यंत दुर्लक्षीत खैरेवाडी येथे कळसुबाई मंडळाचे गिर्यारोहक तीन किलोमीटर जंगलातून, डोंगरदऱ्यातुन पायी चालत पोहोचले.
इगतपुरी तालुक्यातील सुप्रसिद्ध दिवंगत शाहीर शिवनाथ मराडे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी साठविण्यासाठी पाण्याची टाकी, दप्तरे ठेवण्यासाठी लोखंडी कपाट देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देऊन खाऊचे वाटप करण्यात आले.
३ किमी पायपीट करून शाळा सांभाळणारे शाळेचे शिक्षक शाम आदमने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अभिजित कुलकर्णी यांनी शाहीर मराडे यांच्या कार्याला उजाळा देऊन आदरांजली वाहिली.
कार्यक्र माप्रसंगी कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, आदिवासी शिक्षक नेते निवत्ती तळपाडे, बजरंग मराडे, आत्माराम मते, हौशीराम भगत, संतोष म्हसणे, अशोक हेमके, सोमनाथ भोर, गोकुळ चव्हाण, बालाजी तुंबारे, प्रविण भटाटे, बाळू आरोटे, गजानन चव्हाण, सुरेश चव्हाण, उमेश दिवाकर, सोमनाथ भगत, प्रशांत जाधव, बाळू शिद, राजू शेंडे, बाळू उघडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.