वारेगाव येथे विविध योजनांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 08:38 PM2021-04-05T20:38:21+5:302021-04-06T00:17:33+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत वारेगाव अंतर्गत ग्रामपंचायतीच्या निधीतून अनुसूचित जाती जमातींच्या चाळीस कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निधीतून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश देऊन अर्थसहाय्य करण्यात आले. कुकर व धनादेश वितरण संबंधित व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा व साहित्य, ग्रीन जिम, गावात कोरोना लसीकरण सुरू करणे आदी विषयांवर चर्चा झाली. खंडित व कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या संदर्भात कोकाटे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वारेगाव सरपंच मंदाकिनी दवंगे, उपसरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्या रश्मी चिने, सुवर्णा दवंगे, गीता सगर, मिनाबाई घोलप, पाथरे बुद्रुकचे सरपंच सुजाता नरोडे, उपसरपंच गणेश चिने, पाथरे खुर्दचे सरपंच विष्णू बेडकुळे, उपसरपंच मंगल मोकळ, सदस्य पूनम डोंगरे, बाबासाहेब पाटील, प्रकाश दवंगे, माजी सरपंच बाळासाहेब खळदकर उपस्थित होते.
वारेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, गहिनीनाथ मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.