सिन्नरला पोलिसांना पाणी बाटल्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 09:10 PM2020-03-26T21:10:16+5:302020-03-26T23:06:03+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने पोलिसांना चोवीस तास ड्यूटी बजवावी लागत आहे. त्यामुळे येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलिसांना पिण्याचे पाणी व सेफ्टी लिक्विडचे वाटप करण्यात आले.

Distribution of water bottles to Sinnar police | सिन्नरला पोलिसांना पाणी बाटल्यांचे वितरण

सिन्नरला पोलिसांना पाणी बाटल्यांचे वितरण

googlenewsNext

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने पोलिसांना चोवीस तास ड्यूटी बजवावी लागत आहे. त्यामुळे येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलिसांना पिण्याचे पाणी व सेफ्टी लिक्विडचे वाटप करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील, अर्जुन घोरपडे, संदीप लोंढे, अजय कुलकर्णी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जगात व देशात थैमान घालत असलेल्या कोरोनापासून जनतेचे रक्षण करण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता उन्हातान्हात उभ्या असलेल्या पोलिसांना वेळेवर पाणी जेवण मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाण्याच्या बाटल्या व सेप्टी लिक्विड घेऊन शिवाजी महाराज चौक, वावी वेस येथे पोलिसांना वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of water bottles to Sinnar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.